जास्वंदाची फुलं येथे हे वाचायला मिळाले:


चरवेली, मुंबई-गोवा महामार्गावर हातखंब्याच्या जरा पुढे गेल्यावर लाल धुळ बसलेला एक बोर्ड दिसतो. गणपती, होळी आणि मे महिन्यांत डोळे आसुसलेले असतात हा बोर्ड बघायला! हायवे सोडुन गावाकडे जाणा-या रस्त्याकडे वळलं की आजुबाजुची सगळी ओळखीची घरं आणि शेतं दिसायला लागतात. त्यातच आजोबांनी सुरु केलेली टुमदार काजु फॅक्टरी दिसते. तिथली माणसं दुरुनच हात वगैरे करतात. "बाळुकाकांची नात हो ती! मोहनची ना गो तु?" असं कोणीतरी केस पिकलेली, तोंडाचं बोळकं झालेली आजी तिचे बारीक डोळे अजुनच बारीक करुन विचारते...

नागमोडी वळणं घेत, काजु-आंब्यांच्या बागांमधुन उतरल्यावर समोरचं दिसते आमच्या गावची छोटीशी नदी. आणि गोड्या पाण्याचा एक १२ महिने वाहणारा झरा. नारळ-सुपारीची काही झाडं सुगरणीची घरटी मिरवत उभी असतात. खंड्या, कोतवाल,बगळा, टिटवी सारखे पक्षी पाण्याच्या आजुबाजुला दिसतात. मध्येच एखादा पोपटांचा थवा आकाशातुन उडत जातो. झ-यावर पाणी भरायला ...
पुढे वाचा. : दूर राहिले माझे खेडे...