Laughing Shop लाफिंग शॉप येथे हे वाचायला मिळाले:
साहित्य संमेलनात ज्यांना कविता सादर करण्याची संधी मिळत नाही. अशा कवींनी आयोजीत केलेल्या साहित्य संमेलनास उपस्थीत राहण्याचा योग आला. वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय, नोकरी करणार्या कवींनी आपल्या कवीता या मैफलीत सादर करून एकच धमाल उडवून दिली.
सर्वप्रथम भाजीपाल्याचे ठोक व्यापारी गणपतराव यांनी आपली 'परसबाग' ही रचना सादर केली.
हिरव्या मिरचीचा तोरा
चाफेकळीच्या नाकावर
कसा शोभतो अबोला
टमाट्यांच्या गालावर
भुरूभुरू उडती बटा
डुले जसा तुरा मक्याचा
पाठीवर रुळे शेपटा
जसा वेल पडवळीचा
जसा हिरव्या कोशिंबीरीवर
रंग बीटाचा सांडला
सखे जीव माझा
तसा तुझ्यावर जडला
केवळ तीन कडव्यात गणपतरावांनी सर्व रसिकांना कृषी उत्पन्न बाजार समितीची सफर घडवून आणली. प्रेम आणि भाजी मार्केट ही दोन्ही चित्रे कवितेत एकाचवेळी मांडण्याचा काव्यविश्वातील हा पहिलाच प्रयत्न ...
पुढे वाचा. : कवी संमेलन - गल्ली ते दिल्ली