पुरंदरचा वाघ सरदार येथे हे वाचायला मिळाले:
जाहला अंधार । लोपला दिनकर । रात्र ही भयाण । दाटूनी आली।।“ऐका ऐका…. वाचतोय ते नीट ऐका… नुसतं डोकं खाजवत बसला तुम्ही… स्कॉलर म्हणे… मला नावं ठेवा फक्त… काय उपयोग तुमच्या डिग्य्रांचा? चुलीत घाला त्या…’ राहुल बेहोश होऊन बडबडत होता आणि बाकीचे आ वासून पाहात होते.
आ वासणारच होते ते… दुपारी जेवणानंतर सगळे आपापल्या कॉपी घेऊन पत्राचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होते. होता होता संध्याकाळ झाली, तरी अर्थ काही लागत नव्हता. शेवटी सगळ्यांनाच थकवा जाणवू लागला. तेव्हा राहुलनं बाहेर फिरून यायची टुम काढली. त्याचं खरंही होतं. जरा मोकळ्या हवेत फिरलं, त्या पत्रापासून दूर गेलं, की सगळेच फ्रेश होणार होते…
बाकीच्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं आणि मस्त गार वाऱ्यात सारेच हिंडायला बाहेर पडले.
बंगल्याच्या मागे टेकडी होती. त्या टेकडीवरून सूर्यास्त छान दिसतो, म्हणून त्यांची पावलं तिकडे वळली.
टेकडीवरून परतताना राहुलची कुरकूर सुरू झाली…
“साला इतक्या दिवसांनी निवांत आलोय इकडं आणि ते पत्र धरून बसलोय. आता रात्रही बहुतेक तशीच “कोरडी’ जाणार… बास की आता… चला मस्त दोनपेग लावू राव…’
“तुला कारणच हवं असतं… बघावं तेव्हा दोन दोन पेग… काही नको आता. आणि ढोसल्याशिवाय तुझी ट्रीपच होत नाही का रे?’ हा फणकारा अर्थातच प्रियाचा होता…
“त्याच्यावर का खवळतेस? जाऊ दे ना… त्याच्या मनात आलं ते बोलला तो… ते पेगचं माहीत नाही मला; पण आता किमान काही वेळ तरी ते पत्र मलाही नको वाटतंय… इतक्या दिवसांनी भेटलोत आपण, जरा मस्त गप्पा मारू की…,’ आसावरीनं राहुलच्या कल्पनेला अनुमोदन दिलं.
“खरंय राव… राहुल्या खरंच चल दोन दोन पेग मारू…,’ अगदी खरं सांगायचं तर रोहितही याची वाटत पाहात होता.
“हं… बायको नाही बरोबर तर चेकाळलाय… काही नाही पेगबिग. पत्राचा अर्थ लागल्याशिवाय काहीही ...
पुढे वाचा. : फँटास्टिक स्टोरी भाग ५ : घ्यावी आता धाव । तुम्ही झडकरी ।।