पुरंदरचा वाघ सरदार येथे हे वाचायला मिळाले:
लोणावळ्यातील एका शांत बंगल्यातल्या बागेमध्ये मंदार आणि त्याचे मित्र बसले होते.***
त्या दिवशी रात्री श्रीमंत बळवंतरावांविषयी ऐकल्यानंतर रोहितनं हे लोणावळ्याला जायचं ठरवलं. योगायोगानं दुसऱ्या दिवशी शनिवार होता. त्यामुळे शनिवार-रविवार असे दोन दिवस मिळतील आणि काहीतरी मार्ग शोधता येईल, असं त्याला वाटलं. त्याची ही कल्पना सगळ्यांनीच उचलून धरली. मंदारचा अगदी शाळेपासूनचा चौघांचा ग्रुप होता. रोहित, राहुल, किरण आणि मंदार हे अगदी लंगोटी यार… उरलेल्या दोघांच्याही कानावर ही गोष्ट घालायला हवी आणि पुढे काय ते ठरवायला हवं, यासाठी ही खास मीटिंग होती. मंदारच्या आई-बाबांना येणं शक्य नव्हतं आणि या मुलामुलांमध्ये आपलं काय काम, असं वाटल्यामुळे ते काही आले नव्हते. बाबांकडची ती वही मात्र स्वातीनं आवर्जून बरोबर घेतली होती.
रोहित लहानपणापासूनच गाड्यांमध्ये रमणारा. त्यामुळे त्यानं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करून त्याच व्यवसायात उडी मारली. दुचाकी असो किंवा चारचाकी, रोहितचा हात लागला आणि गाडी पळायला लागली नाही, असं होणारच नाही. त्यानं छोट्या गॅरेजपासून सुरुवात करून आज टोयोटाची डीलरशिप मिळवली आहे. त्याच्या दारातही गाड्या उभ्या आहेत. तरीदेखील त्याला स्वत:ला बाईक आवडते. त्यानं खास लंडनहून बीएमडब्ल्यूची बाईक मागवली आणि इथंच असेंबल केली! सध्या तो तीच गाडी वापरतो. लोणावळ्याला मात्र, तो स्वाती आणि मंदारला घेऊन कारनंच आलाय. याचं लग्न झालंय. बायकोचं नाव मनीषा. सगळ्यात चंट असूनही त्याचं लग्न मात्र अरेंज झालं. ती घर सांभाळते. तिला त्याची मनापासूनची आवड आहे. तिच्यामुळे रोहितचा परिवार एक राहिलाय. आज त्यांचं सारं कुटुंब तिनं बांधून ठेवलंय. एका घरगुती कार्यक्रमामुळे ती या मीटिंगला येऊ शकलेली नाही. लौकिकार्थानं रोहित यशस्वी आहे. स्वत:चं घर, गाड्या, उत्तम व्यवसाय, आणि उत्तम चाललेला संसार… सगळं काही अगदी मनासारखं!
राहुल हा एका कंपनीचा डायरेक्टर आहे. खरंतर त्याचा प्रवास पाहता हे एक मोठं आश्चर्यच आहे. त्यानं एसवाय नंतर शिक्षणाला रामराम केला. त्याला ...
पुढे वाचा. : फँटास्टिक स्टोरी भाग ४ : कबजाडकहवपला केफअंअनधाटफर।???