प्रत्येक व्यक्तीच्या एखाद्या कृत्या मागे एखादा उद्देश असतो. हा नियम ध्यानात घेवून आपण गांगल ह्यांच्या नव्या 'एसगांगल' फाँट कडे व त्याच्या प्राचाराच्या मोहीमेकडे पाहायला हवे.
शुभानन गांगल ह्यांचं 'मानवी भाषाविज्ञान : उच्चारसातत्य' हे चारशे रुपये किमतीचं पुस्तक साधारण चार-पाच वर्षापूर्वी लोकसत्तेत एक लेख आलेला होता त्या लेखावर विश्वास ठेवून उत्सुक्त्तेपायी त्यांच्या घरी जावून खरीदी केले. त्यावेळी मला स्वतःला मराठी व्याकरण व देवनागरी लिपी बद्दलची माहीती हवी होती. ह्या पुस्तकात भयंकर गोंधळाने भरलेले लिखाण आहे. माझे चारशे रुपये पाण्यात गेले ह्याचा मला बराच राग आला होता. त्याही पेक्षा ज्या व्यक्तीने लोकसत्तेत लेख लिहीला त्याचा राग आला होता.
श्री. गांगल यांचे तर्कसुत्र (लॉजीक) अजिबात शिस्तबद्ध व तर्कसुसंगत नाही. त्यांना फॉंट व लिपी ह्या संकल्पनेतील भेद ही पूर्वी समजत नव्हता. कदाचित परदेशातील अनेक पुस्तके वाचून त्यांचा भाषाविज्ञान, लिपी, व्याकरणाबाबत भलताच गोंधळ उडालेला आहे.
परंतु इतकं जरी असले तरी एक गोष्ट मी मान्य करतो, की त्यांच्या मध्ये चिकाटी भरपूर आहे. चिकाटी कोणत्या बाबतची? असा प्रश्न विचाराल तर, जी माझ्यात नाही असेच मी म्हणू शकतो. मी स्वतः असे मानतो की जर का मराठी भाषक सध्या जी लिपी, देवनागरी म्हणून वापरतात, त्यात काही सुधारणा केल्या तर मराठी भाषकांचे नशीब बदलू शकते. हा झाला माझा विचार. श्री. गांगल ह्यांना ही ह्या बाबतची अनुभूती झाली आहे का ते मला माहीत नाही. परंतु जे काम मी तडफेने करायला हवे, ते काम श्री̱. गांगल त्यांच्या तोडक्या-मोडक्या पद्धतीने करीत आहेत. 'त्यांचा हा गुण मला मिळावा', अशी माझी खूप इच्छा आहे.
प्रत्येकाला आपल्या मालाची जाहिरात करण्याचा हक्क असला तरी एकतर त्या जाहिरातीने ग्राहकांना चुकीची वा दिशाभूल करणारी माहिती दिली जाऊ नये, व दुसरे म्हणजे दैनिकांनीही जाहिरात ही जाहिरात म्हणून छापावी, बातमी म्हणून नव्हे अशी अपेक्षा करणे गैर आहे काय?
श्री. गांगल ह्यांना धंदा नक्कीच करायचा नाही आहे असे मी अजून समजतो.
(काही भाग संपादित : प्रशासक)