मक्लासटीचरची भूमिका घेण्याचे काही कारण आहे असे मला वाटत नाही.

प्रशासकांना त्यांचे काम काय आहे याची संपूर्ण कल्पना आहे.

नकारात्मक उर्जा वगैरे काहीही तयार होत नाही.

प्रतिसादकांना स्वातंत्र्य आहे विचार मांडण्याचे, प्रशासकांना ते छापण्याचे / संपादीत करण्याचे / रद्द करण्याचे.

( आपल्यालाही स्वातंत्र्य आहेच, चर्चा प्रस्ताव मांडण्याचे! )

संतुलीतपणे संपादन करत बसायचे म्हंटले तर प्रतिसाद पंधरवड्याने दिसायला लागतील.

( बाकी : व्यक्तिगत रोख दिसू नये म्हणून मुळात आपल्याच स्वतःच्या लिखाणात काय बदल करायला पाहिजेत ते आपले आपण ठरवावे असे माझे मत आहे. )