अरुणकाका,

अनुभव-कथन एकदम मस्त झालाय, वाचताना मजा आली. तुम्हाला जबडा जायबंदी झाल्याने जो त्रास झाला त्याबद्दल माझी सहानुभूती आहेच, पण एकूण लेख मनोरंजक आहे.

अवांतर : खरं तर आपण पहिल्या भागात जे सेवानिवृत्तीनंतरचे उपप्रकार (म्हणजे रोज सकाळी 'न चुकता' फिरायला जाणे, ज्येष्ठ नागरिक संघाचा सदस्य होणे, हास्यक्लबाचा सदस्य होणे, योगासनाच्या वर्गाला जाणे, सकाळ-संध्याकाळ मंदिरात जाणे, इ.) सांगितलेत ते वाचून माझ्या आजोबांची आठवण आली. आणि कदाचित त्यामुळे मी जास्त आपुलकीने वाचले