आमचे डोके मुळातच बथ्थड असावे. दिवसेंदिवस तुमचे लिखाण जास्त दुर्बोध व्हायला लागले आहे की म्हातारपणामुळे आमचे डोके चालायचे थांबले आहे ते कळत नाही. असो. एखाद्या मैफिलीत काही श्रोते तल्लीन झालेले असतात तर गाणं अजिबात न कळणारे खुशाल पेपर वाचत असतात. अशा वेळी आमच्या सारख्या गाणं अर्धवट कळणाऱ्यांची जी गत होते तशी आताशा आमची , तुमचे उच्च स्तरावरील लिखाण वाचताना होत आहे. दमछाक होत आहे.
पु. ले. शु. निदान् जे समजू शकतात त्यांनी तरी आनंद घ्यावा व आम्हा मूढांना कळवावा.