एकच नाव जरी वारंवार सगळ्या, संस्थांना देणे चुकीचे वाटत असले, तरी या दोन्ही महान व्यक्तीमत्वांचे नाव हे,  "इतर" आक्रमकांच्या सहज तोंडात रुळलेल्या म्हणून रुढ अशा वाईट सवयीला छेद देणारेच असल्याने, तार्किक, तात्त्विक, नैतिक कोणत्याच बाबतीत ते यत्किंचीतही गैर नाहीच.

येवूद्यात " इतरांच्या" तोंडात शिवाजी महाराजांची, महात्मा फुल्यांची नावे वारंवार.

त्यानिमीत्याने सगळेच पावन होतील. नामस्मरणाचे महत्त्व काय कमी आहे?

कोणत्याही मापदंडाने हे समाजपुरुष अत्यंत थोरच होते, आहेत व राहणार.

खानदानी वारसा असल्यागणीक " आक्रमकांची नावे " आबाद, आबाद म्हणत तोंडात रुळवायची अन मग तश्याच    "भविष्याची" बिजे रोवण्यास स्वाआज्ञावली घासायची, कुठेतरी, केंव्हातरी, कोणीतरी हे थांबवायला नको?

मग कोणीतरी म्हणजे माझ्यापासून सुरुवात, रुजुवात करायची की पिढ्यानपिढ्या कोणीतरी " दुसरा" येवून करेल याची वाट पहायची?

धन्यवाद !