काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


लग्न म्हंटलं की लग्नाच्या आधिचे सुंदर दिवस आठवतात - पहा.. मला वाटलंच की तुमचा गैरसमज होणार, म्हणजे लग्नानंतरचे दिवस तर चांगले गेलेच ,पण आधिचे दिवस थोडे जास्तच चांगले होते.. थोडं फार लपुन फिरणे, सगळ्या बागा, तलावाचे काठ, आणि गर्दी नसलेली रेस्टॉरंट्स   पालथी घातली होती. असं कुठलंही नागपुरमधलं उद्यान नाही की जिथुन आम्हाला दोघांना हाकललेलं नाही.. खरंच लिहितोय. मग कधी तरी घरी पण बातमी पोहोचायची तिच्या पण.. कुठल्यातरी  ( म्हणजे मी) मुलासोबत दिसली म्हणुन….आउ द्या..स्वतःबद्दल लिहायचं नाही आज..

हा लेख स्वतःच्या लग्नाबद्दल नाही. पण इतर लग्नच्या गमती सांगायचंय आज.  दर्यापुर नावाचे एक गांव आहे अमरावती जवळ. तिथे लहानपणी आत्याकडे जाणं व्हायचं उन्हाळ्यात.घरामागच्या मंदिरात जवळपास रोजच लग्न लागायची.  मुख्यत्वे  शेतकरी, कींवा शेतावर काम करणारे मजुर वगैरे ह्या क्लासची लग्न तिथे व्हायची.

आम्ही अंगणात झोपलेलं असायचॊ. सकाळी ५ वाजता मोठ्या आवाजात रुप तेरा मस्ताना  लाउडस्पिकर वर सुरु व्हायचं-,वेक अप कॉल ला ! तेंव्हा असा काही नियम नव्हता की लाउडस्पिकर केंव्हा आणी किती वेळ सुरु ठेवायचा, त्यामुळे अगदी जेंव्हा केंव्हा मनात येइल ...
पुढे वाचा. : लग्नावरची पोस्ट