जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
ज्योतिषशास्त्र किंवा भविष्यकथन हे शास्त्र आहे की नाही या विषयावर असलेला वाद हा न संपणारा आहे. या विषयावर दोन्ही बाजूचे समर्थक तावातावाने बोलत असतात. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे विद्यापीठातून ज्योतिषशास्त्र हा विषय शिकवण्यावरून मोठा वाद झाला होता. मात्र असे असले तरी प्रत्येकालाच आपल्या भविष्याविषयी उत्सुकता असते. आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार, ते जाणून घ्यावे असे सर्वानाच वाटते. काही जण उघडपणे हे औत्स्युक्य दाखवतात तर काही लपूनछपून आपली भविष्य जाणून घेण्याची हौस पूर्ण करून घेतात. सर्वसामान्य माणसांच्या भविष्याप्रमाणेच राजकीय पक्ष, देश, राजकीय नेते यांचेही भविष्य वर्तवले जात असते. नुकत्याच आपल्याकडे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. देशात मतदानाचे अजून दोन टप्पे बाकी असल्याने ...