Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

तुमच्या आमच्या सारख्या बऱ्याच घरात हे असे प्रत्यक्ष व देहबोलीतून ठसक्यात व्यक्त होणारे संवाद घडत असतातच. प्रसंग एक, माणसे प्रत्यक्ष दोन अप्रत्यक्ष दोन, काळाचे टप्पे दोन.

मुलाचे-विजयचे नुकतेच लग्न झालेले. सुनेने-रेवाने संध्याकाळी चहा केला, सगळ्यांना-म्हणजे सासू-सासरे, विजय व स्वतःला दिला. रिकामे कप आत नेऊन ठेवले, विजय व रेवा फिरायला बाहेर पडले.

जिना उतरताना रेवा विजयला म्हणाली, " येईलच हाक आता तुझ्या आईची, रेवा आधी वर ये. चहाचे भांडे, गाळणी व कपबश्या स्वच्छ विसळून जागेवर ठेव आणि मग कुठे जायचे ते जा. " हे तिचे सांगणे पुरे होतेय तोच खरचं आईची हाक आली आणि रेवा ...
पुढे वाचा. : रिसीवींग एंड ला मीच आहे रे