पुरंदरचा वाघ सरदार येथे हे वाचायला मिळाले:

सोमवारी सारेजण आपापल्या कामाला लागले असले, तरी त्यांच्या मनातून शनिवार-रविवार, खासकरून मनीषाचं बोलणं काही जात नव्हतं. त्यामुळे हातानं काम सुरू असलं, तरी डोक्‍यात मात्र ते पत्र, श्रीमंत बळवंतराव आणि येऊ घातलेलं अनामिक संकट यांचेच विचार घोळत होते.

रविवारी मनीषानं बोलणं थांबवलं, तेव्हा सगळे विचारात पडले होते. थोडी भीती, थोडी उत्सुकता, थोडं दडपण आणि थोडा उत्साह अशा संमिश्र भावना मनात घेऊन त्या साऱ्यांनी लोणावळा सोडलं, ते सोमवारी संध्याकाळी मंदारकडे पुन्हा भेटण्याचं ठरवूनच. दिवसभर कोणाचंही कामात लक्ष नव्हतं. मंदारचं तर नव्हतंच नव्हतं. सोमवारी तो ऑफिसला गेला, तो वेगळ्याच मन:स्थितीत. ज्याच्यावर असा प्रसंग आलाय, त्याची मन:स्थिती वेगळी कशी असणार म्हणा! तिकडे स्वातीदेखील अपसेटच होती. तिला मंदारनं हे संकट स्वत:वर ओढवून घेऊ नये, असं मनोमन वाटत होतं. तिनं घरी आल्यावर मंदारच्या आई-बाबांनाही सगळं सांगितलं होतं. खरंतर त्यांना सारंकाही सांगू नये, असं मंदारचं म्हणणं होतं. पण त्यांना अंधारात ठेवून काहीही करू नये, हे स्वातीचं म्हणणं त्यांना पटलं. हे सगळं ऐकल्यानंतर मंदारचे आई-बाबादेखील गंभीर झाले होते. तरी सकाळी त्यांना खाऊ घालूनच स्वातीनं सगळं सांगितलं होतं. बाकीच्यांना टेन्शन आलेलं असताना मंदार मात्र वेगळाच वागतोय, हे ऐकून तर त्यांना अधिकच दडपण येऊ लागलं. हे जे काही घडतंय, ते विचित्र आहे, त्यामागे कोणतीतरी शक्ती आहे, यावर त्यांचं एकमत झालं. तसं काही नसतं, तर त्यांचा सरळ साधा मुलगा एवढं मोठं संकट अंगावर घेण्यासाठी सरसावलाच नसता!

 ...
पुढे वाचा. : फँटास्टिक स्टोरी भाग ७ : भिडणार संकटाला!