पुरंदरचा वाघ सरदार येथे हे वाचायला मिळाले:

राहुल मजेत म्हटला खरं… पण त्यामुळे सारेच गंभीर झाले होते. मंदारला आलेलं एक पत्र आणि त्यामुळे सुरू होऊ घातलेला प्रवास एवढं गंभीर वळण घेईल, असं तोपर्यंत कोणाच्या ध्यानीमनीही आलं नव्हतं.

राहुलनं मजेमजेत का होईना; पण ते वळण ध्यानी आणून दिल्यानंतर सारेजण बराच वेळ शून्यात बघत राहिले होते. मंदार आणि स्वातीचा चेहरा बघवत नव्हता. स्वाती त्याच्याशी भांडायची ती त्यानं "डॅशिंग’ व्हावं म्हणून. बाकी त्याच्यात खोट काढण्यासारखं काय होतं? आणि असतं तरी तो तिचा नवरा होता आणि तिचं त्याच्यावर मनापासून प्रेमही होतं. खरंतर मंदारनं असं एखादं साहस करणं तिला आवडलंही असतं; पण इथे कशाचा कशाला पत्ता नव्हता आणि त्याच जिवावरचा धोकाही होता… त्यामुळे सुरुवातीला असलेला तिचा उत्साह मावळला आणि त्याची जागा चिंतेनं घेतली.

...
पुढे वाचा. : फँटास्टिक स्टोरी भाग भाग ६ : सज्जनपणा बलवानच असतो