वादळाने पाठ माझी, सोडली आहे कुठे ?
खोड व्हावे तूच न च मग वेलही रमली कुठे?

भेटणारा भेटतो अन् टाळणारा टाळतो
धोरणे काही अशी जी सांगणे नाही कुठे...

योजना असतात मोठया, छावणीच्या नेहमी
ही लढाई संपवूया, शस्त्र मजजवळी ते कुठे?

संपलो आहे कधीचा, पाहुनी करुणा तुझी
घे भरारी चेतवाया, सांग ती प्रतिभा कुठे?

मी किनाऱ्याचा भरोसा, ठेवला होता जरी .....
लोटू दे जलधीच सारा, सांग भेटावे कुठे?

आसवांच्या त्या पुरातच, काल सारे संपले
आज येते जी नव्याने साद कळली का कुठे?

सर्व प्रेमाच्या कहाण्या, चांगल्या असतीलही
तू कहाणी सांग सर्वां, शल्य ते कळते कुठे?

मी फुलांचे घावसुध्दा  टाळतो आहे अता ...
खंत का मग कंटकांची सांगणे कोणा कुठे?