"मुक्तसंवाद" येथे हे वाचायला मिळाले:
केवळ वैदर्भीयच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यविश्वाचा झेंडा मानाने फडकत ठेवण्यात सिंहाचा वाटा असलेले नागपूरचे प्राचार्य डॉ. राम शेवाळकर यांचं आज निधन झालं. सकाळी अन्हिक आटोपून, देवपूजा झाल्यावर रोजच्याप्रमाणे नामस्मरण करीत असतांना अचानक हृदयविकाराचा अतिशय तीव्र झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली.
स्मृतींना उजाळा देतांना तीन वर्षांपूर्वीचा प्रसंग मला आठवला. नागपूरच्या धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणावर रामभाऊंचा अमृतमहोत्सवानिमित्य अभीष्टचिंतन सोहळा होता. खुद्द लतादीदी, बाबासाहेब पुरंदरे आणि हृदयनाथ मंगेशकर केवळ रामभाऊंवरील प्रेमाखातर उपस्थित होते. इतक्या मोठ्या व्यक्तीचा तितक्याच मोठ्या महानुभावांनी केलेला सत्कार पाहण्याचा प्रसंग आयुष्यात प्रथमच आलेला असल्यामुळे फिजिक्सचा क्लास बुडवून मी तो दिमाखदार सोहळा बघायला गेलो होतो. शेवाळकरांवरच्या लोभामुळे अगणित वैदर्भीय रसिकांनी हजेरी लावली होती. दुरून का होईना, तो कार्यक्रम बघता आला याचा आनंद माझ्या मनात पुढे कित्येक वर्षं टिकणार आहे.
ज्ञानेश्वरांच्या शब्दरचना, दीदींचा स्वर आणि "वक्तादशसहस्त्रेषु" रामभाऊंचं अतिशय लाघवी आणि सहजसोपं निरूपण, हे असं काही समीकरण जुळलेलं आहे, की त्याची कितीही पारायणं केली, तरी थोडीच आहेत. प्रथम वर्षाला मी मराठी ऐच्छिक विषय म्हणून घेतला होता. केवळ पासिंग मार्कस् हवे असल्यामुळे दोनच धड्यांवर लक्ष दिलं, एक- पु.लं. चा हरितात्या, आणि दुसरा- पसायदान. पैकी हरितात्या या धड्यावरचे दोन लहान प्रश्न, आणि रामभाऊंच्या निरूपणाच्या कॅसेटस्वरून शेकडो वेळा ...
पुढे वाचा. : "वक्तादशसहस्त्रेषु . . . "