संत साहित्य सुधा येथे हे वाचायला मिळाले:
महाराष्ट्राच्या संत परंपरेत पूज्य एकनाथ महाराजांचे नांव अग्रभागी आहे. प्रपंचात राहून सुद्धा, गिरीकंदरात तपाचरण करणा-या योग्यांपेक्षा मोठी योग्यता असणारे नाथ प्रपंचात राहून पारमार्थिक साधन करू इच्छिणा-यांसाठी दीपस्तंभा सारखे आहेत. नाथांनी भरपूर लिखाण केले. "एकनाथी भागवत" त्यापैकी एक... नाथभागवतात सुंदर ओव्या आहेत. त्यातील कांही निवडक ओव्या येथे देत आहे । नाथभागवतात मुक्त पुरुषाचे वर्णन करताना नाथांची ओवी अधिक बहारदार होते. उपाधीशून्य असणारा भागवतोत्तम नाथांच्या लेखणीने सजीव होतो. ज्या ज्या सद्भाग्यवंतांना सद्गुरुंचा सहवास लाभला आहे त्यांना हे वाचताना आपल्या सद्गुरुंची आठवण झाल्याशिवाय रहाणार नाही.