गांगल ह्यान्नी जो फॉन्ट त्यांच्या साईटवर ठेवला आहे तो मी वापरून पाहिला. त्यात रोमन अक्षरांचे मॅपिंग केले आहे. तो "character map" मध्ये जाऊन पाहिला असता तो ASCII वापरतो असे दिसले. असे फॉंट वापरल्यांने मराठीचे बरेच नुकसान झाले आहे. असे वेगवागळया फॉंटमध्ये लिहलेले मराठी, तेच फॉंट असल्याशिवाय वाचता येत नाही. म्हणुन युनिकोड ही प्रमाण पद्धत पुढे आली.
युनिकोडाविषयी त्यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. लोक्सत्तामध्ये असे लेख लिहून ते लोकांची दिशाभूल करत आहेत असे वाटते. लोकसत्तासारख्या प्रतिष्ठित दैनिकाने असे लेख छापण्याआधी लेख /लेखकाची शहानिशा करून घ्यावी.