चौकसराव,
छान गोष्ट... पण मला वाटतं की तुमची प्रतिभा इतकी बहरलेली आहे.....कल्पना आणि वास्तवाचे सगळे खेळ तुम्ही लीलया खेळू शकता.. अनेक अतर्क्य आणि विलोभनीय संकल्पनांनी तुमची भाषाशैली विनटलेली आहे....तर मग तुम्ही एकसुरी फक्त जी एंच्या ( लघुकथा - रुपककथा) स्टाईलला धरून राहण्या ऐवजी निरनिराळे प्रयोग का नाही करून पाहत मराठी सारस्वतात? खरेच आम्हाला अशा झगझगत्या, उत्तम लिखाणाची अपेक्षा आहे............