डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


निखिल सकाळी ६.३० ला ऑफिसपाशी पोहोचला. थोडीफार लोक आधीच येऊन थांबली होती. एक-एक करत सगळे येऊन निघायला ७.३० वाजले. इतके दिवस प्रचंड काम केल्यानंतर शेवटी तो दिवस येऊन ठेपला होता. आज ऑफिसची ट्रीप होती. एक आठवडा मस्त मौज करायची, कामाची कटकट नाही, तारखांचे गणीत नाही की मीटिंग्ज ची कंटाळवाणी बडबड नाही. आठवडाभर मस्त आराम आणि धिंगाणा.

गप्पा, गाणी, ओरडा-आरडी यामध्ये अलिबाग कधी आले कळलेच नाही. अथांग पसरलेला समुद्र किनारा पाहून सगळ्यांचाच प्रवासाचा थोडाफार आलेला शीण निघून गेला. आणि राहण्यासाठी घेतलेले हॉलिडे-रिसॉर्ट पाहून तर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सगळेजण आनंदाने बेभान झाले होते.
संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर दंगा-मस्ती, पाण्यात डुंबून सगळेजण हॉटेलवर परतले. खोलीतून आवरून बाहेर पडतात-न-पडतात तोच त्यांच्या कानावर जोरजोरात वाजणाऱ्या गाण्यांचा आवाज पडला. हम्म.. डि.जे आहे तर.. निखिल स्वतःशीच बडबडला.

पुढचा १ तास पूर्णं धिंगाणा घालण्यात गेला. नवीन हिंदी-इंग्लिश गाणी, रिमिक्स यावर सगळ्यांची पावलं नुसती थिरकत होती. शरीरातून घामाच्या धारा वाहायला लागल्या तसे एक एक जण कमी होऊ लागले. पण निखिल मात्र पूर्णं जोषांत होता. इतक्या दिवसाचा मानसिक थकवा घालवायला नाचणे हाच योग्य उपाय होता, आणि नृत्य तर निखिलचा छंदच मग तो कसला थांबतोय. हळू हळू करत गर्दी कमी होत गेली आणि निखीलला ती दिसली. Blue Stripe चा Top, Black Skirt, सोनेरी कलर केलेले केस, ...
पुढे वाचा. : प्रिती.. तुझी नी माझी - भाग १