Batmidar येथे हे वाचायला मिळाले:
आता निस्तं समजायचं बरंका मंडळी...
निस्तं समजायचं, का ह्यो एक रंगमंचहे. ह्या रंगमंचावर नेपथ्या म्हनून एक परदा सोडलेलाहे. त्या परद्यावर यमुनेचं चित्र काडलेलंहे. यमुना म्हंजे रात्र काळी, घागर काळी यमुनाजळी काळी वो मायमधली यमुना! आधीच स्पष्ट केलेलं बरं. नाय तं तुमचा गैरसंबंध व्हायचा! त्या यमुनेच्या काठावर एक वडाचा डेरेदार वृक्शहे. रंगमंचाच्या मोहरं पब्लिक म्हंजी मायबाप प्रेक्शकजन बसलेलंहे.
पन मंडळी ह्यो इव्हेंट हाय तरी काय?
तं तुम्हाला आता लई ताटकळत ठेवत नाय. सांगूनच सोडतो, का इथं आता गनगौळन व्हनार हाय. ते बगा 'घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निगाल्या पान्या गौळनी' या गवळनगीताचं बॅकग्राऊंड मुझिकबी सुरु झालं.
(सारेगमप लिटिल च्यांपमधी हे गीत कोनी गायलं व्हतं? पल्लवी जोशीनं की कार्तिकी गायकवाडनं? या प्रश्नाचं बरोबर उत्तर देना-या पयल्या दहा पत्रकारांना, मुंबईत पुढारी नेमका कव्हा लॉंच व्हनार याची तारीख पोस्टाने कळविन्यात येईल. तव्हा पाचपाचपाच ...
पुढे वाचा. : गणगौळण