नितिन पोतदार येथे हे वाचायला मिळाले:
मागील लेखात येत्या १० वर्षांत ‘मोस्ट पॉवरफुल’ सीईओंच्या यादीमध्ये किमान १० सीईओ हे मराठी असायला हवेत आणि १०० अग्रगण्य भारतीय कंपन्यांच्या यादीमध्ये किमान पाच मराठी उद्योगसमूहांचा समावेश असायला हवा आणि निदान त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत असा विचार मी मांडला। मराठी उद्योगजगतात फर्स्ट जनरेशन उद्योजक/ प्रोफेशनल्स मग ते मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील असो की कुठल्याही सव्र्हिस इंडस्ट्रीजमधील आज त्यांची झेप मोठी नसली तरीही त्यांचा कामाचा झपाटा फार मोठा आहे. एका जिद्दीने ते उभे आहेत व एक दिवस आपला येईल या दृढ विश्वासावर ते जगत आहेत. कुठलीही चर्चा करण्यापूर्वी आपल्या या फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्सचं आपण मनापासून अभिनंदन आणि कौतुक करायला पाहिजे.