उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:

कुसुम अज्जीला मांजरांचा फार लळा होता. अगदी माझ्या लहानपणीच्या पहिल्या अाठवणीत सुद्धा तिची काळीभोर मांजर अाहे. तिच्या मागून म्यावत जाणा-या अनेक माऊताया मलाही वेड लावून गेल्या. अज्जीची मांजर मात्र नेहमी "माहेरवाशीण" अाणि "बाळंतीण" असायची! मे महिन्याच्या सुट्टीत जर मांजर थोडी अाडवी अाणि जगाला कंटाळलेली वगैरे दिसली कि अामच्या चौकश्या सुरु होत. "अज्जी माऊला बाळं होणारेत का गं?" मग उगीच रोज "कधी होणार माऊला बाळ?" हा प्रश्न टाळायसाठी अज्जी अाम्हाला थाप मारायची. "नाही. तिला बरं नाहिये. म्हातारी झालीये ती. त्रास देऊ नका तिला. खेळायला पळा बघू!"ह्या उत्तराचा अर्थ अामच्या भाषेत, "होय तिला बाळ होणार अाहे. पण कधी मला माहित नाही." असा असायचा.मग रोज एकदा तरी तिची विचारपूस व्हायची. कधी ती ऊन खात निवांत बसली असेल तेव्हा तिच्यासमोर अाम्ही दोघी मांडी घालून बसायचो. मग ...
पुढे वाचा. : माऊताई