अवाक !!..!!!
काय एकेक रुपके वापरली आहेत .. स्फुट प्रंचंड आवडले. आवडलेल्या रुपकांची यादी करायची म्हटले तर आख्खा लेखच इथे डकवावा लागेल. तरीही त्यातल्या त्यात आवडलेले वाक्य म्हणजे :
माझ्या अनुभवावरून सांगते, जन्माला आल्यापासून मृत्यू होईपर्यंतचा काळ
म्हणजे जीवन नव्हे. आपल्या सामूहिक आकलनशक्तीला समजणाऱ्या या दोनच घटना
असल्याने त्यांचे अवडंबर माजवले जाते.
धबधबा थबकावा तसा काळ थांबला हेही वाक्य अप्रतिम .. काळच कसा थांबेल याचे वर्णन करायला अजून वेगळी इतकी चित्रदर्शी उपमा सापडणे दुरापास्त.
धन्यवाद चौकस.