संजय क्षीरसागर, नमस्कार!

"कॉमर्स म्हणजे पैश्यातून पैसा करणे इतकी सोपी व्याख्या आहे." 

आपण वर हे विधान केले आहे. पण मला ते समजले नाही. कारण कॉमर्स म्हणजे 'देवाणघेवाण' असं आम्हाला तरी आमच्या महाविद्यालयात शिकवले होते. पूर्वीच्या काळी पैसा नव्हता. तेव्हाही व्यापारी होते, श्रीमंत वा धनवान लोकं होती. ते कसे काय?

"तुम्ही व्यवसाय काय करता हा प्रष्ण नाही तुम्ही धाडस करणार की नाही हा प्रष्ण आहे."

मला तुमचे हे विधान ही गोंधळवणारे वाटते. माझ्या मते धाडस तोच करू शकतो, ज्याच्याकडे हरण्यासाठी आपल्या प्राणाशिवाय काहीच नाही. आणि आपला प्राण आपल्या स्वत:कडे तरी कुठे असतो? तो तर आपल्या प्रियजनांपैकी कुणा एकाकडे असतो. मग 'फक्त पैशासाठी' हे भलतं-सलतं धाडस कसं करायचं?

- एक भित्रा मराठी माणूस