मिलिंदराव,
तसे काही नाही बर का? चालुद्या चालुद्या! वरील विडंबन हे विडंबन नसले तरीही चांगले व विनोदी काव्य निश्चीत आहे. तसेच आपण केलेला बदलही मला आवडला. ( सदाचारी ऐवजी पुणे भारी ).
आपल्याला अपेक्षित असे माझे 'मधमाशी' शेर घ्या... हा हा हा! ( जिंदादिली बर का? )
मुळातच जे विडंबन ते विडंबित काय करता रे?
मिलिंदा केशवा पडलात की रे काय आजारी?
अलामत नी कवाफी, बहर, रदिफा लाभल्या मोफत
प्रसूती दत्तकाची का म्हणे? ही काय लाचारी?
स्वगत रंगात करड्या मांडणे हे चांगले नाही
कसे दिसणार माशांना कवींचे रक्त अंधारी?
म्हणा काही मला पण सांगतो मी एक ते ऐका
मनामध्ये असे माझ्या तुम्हासाठी सदा यारी
( मूळ गझलेत न वापरलेले काफिया या शेरांमध्ये घेतलेत यावरून तरी 'काफिया शोधून गझल करणारा असे कुणी म्हणणार नाही असे वाटते. हा हा हा हा हा हा! )