प्रिय सतिशजी

कॉमर्सची खरी व्याख्या : यंत्र, माणसे आणि कच्चा माल वापरून वस्तू किंवा सेवा निर्माण करणे असा आहे.  देवाण-घेवाण म्हणजे विनीमय (एक्सचेंज). विनिमय हा दोन प्रकारचा असू शकतो : वस्तुविनीमय (तुम्ही म्हणता तो) किंवा आर्थिक विनीमय म्हणजे आपण जो करतो तो (पैसे आणि वस्तु). पण कॉमर्स (व्यापार) मधून निर्माण होणाऱ्या वस्तू किंवा सेवा उद्योजक पैसा मिळविण्यासाठीच निर्माण करतो आणि या साठी तो पैसाच गुंतवतो. त्यामुळे खऱ्या अर्थानी उद्योजक पैसे पणाला लावून पैसे मिळवत असतो (प्राण वगैरे नाही).

दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला जे समजता तेच तुम्ही होण्याची शक्यता निर्माण करता. तुम्ही स्वतःला भित्रा मराठी माणूस समजत असाल तर तुम्ही भित्रेच रहाल. हाच चांदणीचा प्रष्ण आहे. आपण स्वतःला मराठी माणूस समजतो आणि पर्यायानी कुणीतरी कधीतरी सांगीतलेली चुकीची मते स्वतःवर लादून घेतो. स्वतःला कोणीही समजण्याची धंदा करण्यासाठी गरज नाही फक्त स्वतःकडे असलेले भांडवल आणि जरूर पडल्यास कर्ज काढून उभे केलेले पैसे मी मला ज्या वस्तू किंवा सेवा पुरविण्यात पैसे मिळतील  असे वाटते त्यात गुंतवीन हे धाडस असेल तरच धंदा सुरू होऊ शकतो.

मी जे केलं तेच दुसऱ्याला सांगतो त्यामुळे संदिग्धतेचा प्रष्णच नसतो.