चांदणी, आपण नेटवर्किंग बद्दल विचारले आहे. ह्यावर अनेक पुस्तकं वगैरे असतील. लिंक्ड-इन वगैरे साईटस चा वापरही आपण करू शकता. मी ह्यावर अधिक लिहू ईच्छित नाही. नेटवर बरच काही मिळेल.
एक सूचना करावीशी वाटते. संजय यांनी सांगीतल्याप्रमाणे औद्योगिकतेचा विचार 'मराठी' पणाच्या चष्म्यातून न करता, केवळ औद्योगिकतेच्याच चष्म्यातून करावा. म्हणजे, मराठी माणसाने काय करावे ह्यापेक्षा, नुसतं मनुष्य प्राण्याने औद्योगिकतेसाठी काय करावे असा विचार करणं वैयक्तिकदृष्ट्या जास्त सोयिस्कर ठरेल.