मिळावे घास थोडेसे, सुखाची झोप लागावी
जवानी याच चिंतेने बनावी जख्ख म्हातारी?.. वा!

इथे आलोच आहे तर जिवाची जिंदगी व्हावी
कशाला आठवावे मी कसा होतो सदाचारी?.. खूब

मला पश्चात माझ्या फारसे काही नको आहे
निघावे नाव थोडेसे, गळावी आसवे खारी... वा

यमाचा वेगळा, ज्ञानेश्वरांचा वेगळा रेडा
तसा होतोस तू मित्रा जसा लाभेल रंगारी.. छान

बरे झाले अताचे भक्त नाही पाहिले त्याने
पुन्हा होईल संसारी, तुका होईल व्यापारी.. खरेय

-मानस६