दान तेही सक्तीचें ते कसें काय बुवा! घरात घुसून उचलून आणणार की काय हो? आणि तरीही नाही म्हंटले तर मारणार सुद्धा कि काय हो? नाही अण्णा! आम्हाला नाही पचले तुमचे हे!

निवडणूकीच्या मतदार नामावली मध्ये खूप चूका असतात. एकाच व्यक्तीचे बर्‍याचवेळा एकापेक्षा जास्त नाव असते. ज्या मुलींची लग्ने होतात. त्यांचे नाव आधिच्या राहत्या विभागात ही असते. व नव्या पत्यावर ही त्यांचे नाव येते. हे एक उदाहरण झाले. जो पर्यंत एका व्यक्तीला एकच ओळखपत्र दिले जात नाही. व ते ओळखपत्र डिजटलाजइड होणार नाही तोपर्यंत मतदारांची संख्या फुगलेलीच राहणार. ही फुगलेली आकडेवारी कमी टक्के दाखवत असावी. तसेच आजारी व अत्यंत म्हातार्‍या लोकांचा मतदानात सहभाग होणार नाही हे ही लक्षात आणून घेतले जायला हवे.