विषय मोठा आहे. वेगळा आहे. अनेक पैलू आकलनापलीकडचे आहेत. शून्य ही संकल्पनाच (आकडा या अर्थी नव्हे, हे विश्व, सृष्टीचा जनक शून्य या अर्थीच) मुळी एका चक्रव्यूहात घेऊन जाणारी आहे. आणि ते चक्रव्यूह आहे याचाच अर्थ प्रश्न तेथेही संपत नाहीत. प्रश्न त्याहीपलीकडे आहेत. त्याचं एक कारण म्हणजे शून्य संकल्पनादेखील माणसाच्याच बुद्धीतून आली आहे. त्याच न्यायाने माणसाची ही बुद्धी म्हणजे शून्य असेही म्हणता येईल.
कथा चांगली झाली आहे. लेखनशैली आवडली. त्यात मांडलेल्या गोष्टी पटल्या नाहीत, तरीही मला लेखन आवडले हे तुमचे यश. पु.ले.शु.
तुमचा वरील प्रतिसाद वाचला. लेखनामागची प्रक्रिया थोडीशी उलगडल्यासारखी झाली. असे अनुभव मलाही येतात. माझ्या एरवीच्या बुद्धीला पटत नाहीत असे विचार एका तर्कसंगत रीतीने उमटत राहतात. त्याविषयीच्या का, काय, कसे, कधी, कोणी, कोठे या प्रश्नांची उत्तरे सापडलेली नाहीत.