आधीच्या ३ भागांपेक्षा हा भाग वेगळा वाटला... कदाचित त्यात सगळेच शून्याचे तत्त्वज्ञान असल्याने वाटले असेल
विषय मोठा आहे. वेगळा आहे. अनेक पैलू आकलनापलीकडचे आहेत. शून्य ही संकल्पनाच (आकडा या अर्थी नव्हे, हे विश्व, सृष्टीचा जनक शून्य या अर्थीच) मुळी एका चक्रव्यूहात घेऊन जाणारी आहे. आणि ते चक्रव्यूह आहे याचाच अर्थ प्रश्न तेथेही संपत नाहीत. प्रश्न त्याहीपलीकडे आहेत. त्याचं एक कारण म्हणजे शून्य संकल्पनादेखील माणसाच्याच बुद्धीतून आली आहे. त्याच न्यायाने माणसाची ही बुद्धी म्हणजे शून्य असेही म्हणता येईल.
असेच काहीसे म्हणावेसे वाटते.
एकंदरीत कथा छान होती. जरा किचकट विषय असला तरी शेवटापर्यंत पकड धरून ठेवली. आपली लेखनशैली आवडली. असेच लिहीत राहा. शुभेच्छा!