पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते : म्हणजे सारे अस्तित्व, शून्य आणि त्यात प्रकट झालेली प्रकृती, हा निसर्ग दोन्हीही पूर्ण आहेत कारण पूर्णात पूर्णच निर्माण होऊ शकते. स्त्री/पुरुष, रात्र/दिवस, जन्म/मृत्य, श्वास/उछ्वास, शांतता/संगीत, स्थैर्य/नृत्य सगळे परस्परावलंबी आहेत पण सगळे या शून्यात या क्षणी पूर्णच आहेत. एका शिवाय दुसर्याला अस्तित्व नाही. त्यामुळेच: पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, पूर्णात काहीही विलीन झाले तरी पूर्ण पूर्णच रहाते. मृत्यूच जन्म देतो, संगीतच शांतता खुलवते, स्त्री पुरूषाला आणि पुरूष स्त्रीला पूर्णत्व देतो, उछ्वास श्वासाला जागा करून देतो, रात्र दिवसाची शक्यता निर्माण करते. जसे शून्य शाश्वत आहे तशी त्यात प्रकृतीच्या प्रकटीकरणाची शक्यताही शाश्वत आहे. शून्याला सृष्टीमुळे अर्थ आहे आणि सृष्टीच्या प्रकटीकरणाचा शून्य आधार आहे. भारताचे इतके वैभवशाली आध्यात्म संसार किंवा प्रकृती नाकारल्यामुळे व्यर्थ झाले आहे. आपण मुळात शून्य आणि प्रकृती दोन्ही एकाच वेळी आहोत. पण आपण एकच चूक युगानुयुगे करत आहोत ती म्हणजे जगाचा पूर्व गोलार्ध शून्य (अव्यक्त) हेच सत्य मानतो. आणि पश्चीम गोलार्ध सृष्टी (व्यक्त) हेच सत्य मानतो. त्यामुळे : 'एकवार चारी बाजूना असणाऱ्या त्या अंधाररुपी पोकळीकडे त्याने पाहिले आणि मग एकदम हात पसरून स्वत:ला खालच्या खोल जाणाऱ्या दरीत झोकून दिले.एकवार चारी बाजूना असणाऱ्या त्या अंधाररुपी पोकळीकडे त्याने पाहिले आणि मग एकदम हात पसरून स्वत:ला खालच्या खोल जाणाऱ्या दरीत झोकून दिले..' असा इतक्या सुंदर अध्यात्माचा दुक्खद शेवट होतो. कुठेही स्वतःला झोकून देण्याची गरज नाही, तुम्ही या क्षणी आहात तसे आहात तिथे पूर्ण आहात असा या   इशावस्य उपनिषदाचा अर्थ आहे. मजेत जगा, कृतज्ञतेत रहा, असे या उपनिषदाचे सांगणे आहे. माणसाचा मुलभूत प्रष्ण 'इनफिरिऑरिटी कॉमप्लेक्स' हा आहे आणि त्याला हे एकमेव आणि माझ्या मते अत्यंत सुंदर उत्तर आहे. जेंव्हा आध्यात्म हा विषय आहे तेंव्हा कथा ही कथा राहत नाही ती सत्याचा उदघोष होते आणि तिथे चूक म्हणजे अनेकांची दिशाभूल ठरते.   संजय