मला गाणे हे जन्मात कळले नसते; पण माझ्या बाबांनी एका झटक्यात ओळखले. शिवाय सगळे भाषांतर चालीत गाऊनही बघितले . त्यांना हात कापण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी लिहीत आहे उत्तर. बाबांनी कॉलेजात असताना असे भाषांतराचे उद्योग केले होते. त्यांना तुमचे भाषांतर जाम आवडले,
वावा शरुताई तुमच्या बाबांचे पाठांंतर चांगले दिसत आहे (आणि आमचे भाषांतरही ? ) इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या लक्षात आहे. वा. अचूक उत्तराबद्दल त्यांचे अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार. कौतुकाबद्दल विशेष धन्यवाद. असाच लोभ राहूद्या. (तुम्ही उत्तर लिहिल्याबद्दल तुमचेही आभार!)
(तुमच्या बाबांची जुनी भाषांतरे असतील तर इथे टाका की . बघुया आम्हाला ओळखता येतात का जुनी गाणी )
(काही भाग संपादित : प्रशासक)