बाणेदारपणा, ताठ मान, स्पष्टवक्तेपणा हे अवगुण नाहीतच, पण धंद्यात तसे वागू शकत नाही.
माझ्या एका उद्योजक मित्राची खरी गोष्ट सांगतो.
तू एक हुशार, टेक्निकल व्यावसायिक होता. स्वतःच्या कर्तृत्वावर कारखाना पुढे आणला होता. पण स्वभाव अति फटकळ! एका निर्यातीच्या वेळी एक्साईज इंन्स्पेक्टरने पैशावरून अडवून धरले. वादावादी झाली. दोघेही मराठी! शेवटी माझ्या मित्राने, तुमची माझ्या पायाशी बसायचीही लायकी नाही असे उद्गार काढले.
परिणामः - निर्यातीला दोन दिवस उशीर झाला आणि त्याआधी मित्राच्या पार्टनरला मिनतवाऱ्या करून दुप्पट पैसे चारावे लागले.
याठिकाणी मी हे स्पष्ट सांगू इच्छितो की हे सर्व निर्लज्ज मागरे मराठीच होते!