पण माझ्या माहितीप्रमाणे संस्कृतमध्ये शून्य या शब्दाला पूर्ण असा समानार्थी शब्द आहे. आणि मला कित्येक वर्षे आणि अजूनही ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली या गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटत आलं आहे. तसं त्यांनी का केलं असावं असा विचार करून करून त्यातूनच हा शेवट माझ्या डोक्यात आला असावा असं माझं प्रामाणिक मत आहे. (तुकाराम महाराजही सदेह वैकुंठाला गेले म्हणतात म्हणजे नक्की काय ते माहिती नसल्याने त्यावर काही विचार केला नाही.)
असो. आधीच म्हटल्याप्रमाणे मी काही अध्यात्माच्या बाबतीत अधिकारी व्यक्ती नाही आणि ही कथा वाचून लोक त्यांची आध्यात्मिक मते ठरवणार नाहीत अशी मला आशा आहे.