उत्तर: 'हमदम मेरेऽऽऽ मान भी जाओऽऽऽ कहना मेरे प्यार का'
गाणे फारसे परिचित नसल्यामुळे (कधीकाळी विविधभारतीवर तोंडावळा असंख्य वेळा ऐकला असला तरी तेव्हा शब्दांकडे नीट लक्ष दिलेले नसल्यामुळे) चटकन लक्षात आले नाही.
(किंबहुना 'हमदम मेरे मान भी जाओ'च्या पुढचे शब्द आज कळले.)
खूप विचाराअंती 'सखये माझ्या' म्हणजे 'हमदम मेरे' असा तुक्का लावायचा ठरवून गूगलबाबाला पुकारले तेव्हा कोठे श्रमसाफल्य* झाले.
*आम्हा पूर्वपुणेकरांना 'श्रमसाफल्य'च आठवायचे.