शाहिस्तेखान :
विडंबनकाराला वृत्त आणि छंदाचेही ज्ञान असायला हवे - निश्चितच.
काहीतरी आचरट लिखाण केले म्हणजे विडंबन होत नाही. - नक्कीच.
अभ्यासासाठी (तरी) केशवसुमार आणि खोडसाळ यांची विडंबने वाचावीत. भरपूर आहेत मनोगतावर - हा हा हा हा
जयंता५२ :
हीन आणि घृणास्पद - माझे लिखाण तर नक्कीच नाही. आपलीही मनोवृत्ती नसेल तशी.
सभ्य लिखाणाच्या (विशेषतः गझलेच्या) किमान मर्यादाही न पाळणे इत्यादी मुळे हे लिखाण निषेधार्ह आहे - असमंजसता
रोज काही तरी, कसे तरी लिहलेच पाहिजे का? - रोज लिहायला मला वेळ कुठे असतो? हे कुणासाठी लिहिले आहे?
पिवळे झाले अजून तितके नसे तुझे..
अजून, थोडे अजून, रगडायला हवे
मूळची ओळ : हिरवेपण हे अजून तितके गडद कुठे?
हिरवेपण गडद असणे म्हणजे काय हे वेगळे सांगायचे आवश्यकता नाही. पिवळेपण म्हणजे परिपक्वता - केस पांढरे आणि पान पिवळे. रगडणे याचा अर्थ घासणे. पण नुसते घासणे म्हटले तर कमकुवत वाटेल म्हणून रगडणे. परिपक्व होण्यासाठी अजून रगडा.
नासणार ही अशीच बहुधा हयात रे..
मुली मिळाल्यावरी परवडायला हवे
यातीलही विनोद कळू नये? अहो, असे विनोद तर रोज मिळतील.
बनू लागता सपट लोशने गजलांची..
इथे न आता कुल्ल्यांस दुखायला हवे
हां. आता इथे कुल्ला हा न शोभणारा शब्द आहे खरा. पण मनोगतावर तो वेळोवेळी दिसून येतो.
इथे किळस आलेली वाटत नाही आहे. वेगळेच काही वाटते आहे. ते सावकाश सांगेन.
अजय जोशी :
तुम्हीसुद्धा? काही ओळी ठीक? कोणत्या?
सुधीर कांदळकर :
हेतू अशुद्ध वाटण्याचे कारणच काय? मी कोणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही.
मुळातच विडंबन काय आहे यापेक्षा ते कोण करते आणि कोणाच्या लिखाणावर करते याला महत्त्व देवू नये.
फारसे गडद नसले तरी ठळक नक्कीच आहे.