चर्चा प्रस्तावाशी आणि कुशाग्र यांच्याशी पूर्णपणे सहमत.
मी माझ्या केबीनमध्ये येणाऱ्या प्रत्येक नवीन माणसाशी किंवा हॉटेलमध्ये वेटरशी किंवा रिक्शा, टॅक्सीवाल्याशी किंवा व्यवसायातल्या सहकाऱ्यांशी (म्हणजे हटकून जिथे सर्वसाधारणपणे हिंदी किंवा इंग्रजीतच बोलणं केलं जातं अशा सर्व ठिकाणी) मराठीतच बोलायला सुरवात करते. अगदीच समोरच्याच्या चेहेऱ्यावर अंधारच पडला तर हिंदी किंवा इंग्रजीकडे पटकन वळता येतं. इतर लोक मात्र काय खेडवळ बाई आहे (किंवा सोsss क्रूsssड...! ) अशा नजरेनं बघत असतात!