मी स्वतः नेहमी न चुकता मराठीतुनच बोलते..  अगदी  डॉमिनोज,  मॅकडोनल्ड, मोठे मॉल्स, ५  स्टार हॉटेल्स वगैरे जिथे लोक अगदी अमेरिकन इंग्रजी वापरतात तिथेही मराठीतुनच बोललेय आणि गंमत म्हणजे न चुकता या ठिकाणी मला मराठी माणसे भेटलीत.... 

जरी समोरचा हिंदीतून उत्तरे देऊ लागला तरी मी मराठीतुनच संभाषण चालू ठेवते. त्याला कळते मला काय म्हणायचेय ते आणि मलाही कळते तो काय सांगतोय ते... समोरचा स्वतःहून म्हणाला कळत नाही, तरच मी हिंदीचा आश्रय घेते..

माझ्या ऑफिसात माझ्या कामाचे स्वरुप असे आहे की भारतभरातून फोन येतात.. समोरच्याच्या उच्चारावरून मराठी आहे असे वाटले तर मी सरळ मराठीतून सुरवात करते. 

साधना.