मी सुद्धा !!!!
आता परदेशात असल्याने इथल्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. शेवटी जिथे जावे तिथली भाषा बोलावी हेच आपण परप्रांतियांना सांगतो ना ? पण मुंबईत असताना कित्येकदा मी हॉटेल, मॉल्समध्येही, "मराठी नाही येत ? अरेरे....." अशी समोरच्याला दया दाखवायचो अन वरून म्हणायचो, आम्ही बघा, ३ भाषा बोलू शकतो, गुजराथी समजू शकतो.... तुम्ही सगळे आळशी.... तुम्हाला कसली भाषा शिकता येणार... अशी कुचेष्टा.... या मुळे माझ्या ऑफिसमधले अमराठी मराठी शिकू लागले होते.....