मराठीचा अभिमान जरुर असावा, पण हिंदीची अवहेलना करण्याचेही काही कारण नाही.
आम्हाला हिंदी छान येते हो
हे विधान सरसकट मराठी लोकांना लागू होत नाही. अपवादाने मराठी माणसाचे हिंदी चांगले असेलही ( तसे मराठी माणसाचे मराठीही अपवादानेच चांगले असते! ) पण एकंदर महाराष्ट्रात हिंदीच्या नावाने आनंदच आहे. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. आपणा सर्वांना हिंदी चांगले आलेच पाहिजे. मराठी तर मातृभाषाच आहे. व्यवसायाच्या, शिक्षणाच्या निमित्ताने इंग्रजी चांगले असावे लागते. एकंदरीत भाषा चांगल्या आल्या पाहिजेत. भाषांवर प्रेम असले की कुठलीही भाषा लगेच आत्मसात करता येते असे मला वाटते.