ह्या कॉमेंटस नि आपण काय साधतोय? चांदणीला व्यवसाय सुरू करायचाय. माझं राहू द्या तिला प्रोत्साहन मिळेल का? एवढ सगळ लिहून त्याचा एकच अर्थ होत नाही का? की अजिबात धोका पत्करू नको हा सल्ला ढोबळ आहे. धंदा आणि आयुष्य अजिबात बॅलन्स होत नाही. (डोळे पांढरे होतील). याउप्पर तुम्हाला मी काय म्हंटल? की तुम्ही नोकरी करत असणार, आणि ही वस्तुस्थिती आहे की नाही? कुठलाही व्यवसायिक नव्या व्यवसायिकाला नाऊमेद करत नाही, हात देतो. अनेक चांगले लोक धंद्यात आल्या शिवाय प्रॉडक्ट क्वालिटी कशी सुधारेल? स्पर्धे शिवाय किंमती कश्या वाजवी होतील? तुम्ही माझं खरच सोडा मी  खरोखरी सगळ्या अंगानी आयुष्य जमवलं आहे पण तुमच्याकडे तिला उपयोगी असं काही असेल तर नक्की द्या. मला सुद्धा तुम्हाला दाद द्यायला आवडेल. 

१) तो एक तर खोटं तरी बोलतो किंवा त्याचा धंदा अगदीच किरकोळ स्वरुपाचा असतो,  असं मला वाटतं.       

२)'आयुष्य फुलवणं' वगैरे असं काही त्यांच्या गावीही नसतं.   त्यामुळे असं जनरलाईज नाही करता येणार.

३) हे प्रतिसाद फार ढोबळ आणि ऍबस्ट्रॅक्ट आहेत.   मला हे पटलं.   तुमचा वरचा उतारा, माझ्या मते,  ढोबळ आणि ऍबस्ट्रॅक्टपणाचं उत्तम उदाहरण आहे.  

 ४) "आयुष्य हा उत्सव आहे आणि मी तुमचाशी शेअर करतो आहे... " या म्हणण्याला स्पेसिफिक असा काही अर्थ आहे का?    

५) हे सल्ले ढोबळ आहेत लक्षात न घेता मुलं तरुण धंद्यात पडतात आणि वास्तवाचं दर्शन झाल्यावर त्यांचे डोळे पांढरे व्हायची पाळी येते.   त्यामुळे असे वरवरचे सल्ले देऊ नयेत असं माझं स्पष्ट मत आहे. 

६) भाषणबाजी करणं आणि सल्ले देणं सर्वात सोपं काम असतं.   स्पेसिफिक्समध्ये जाणं अवघड. म्हणूनच ते फारसं कुणी करत नाही.     

संजय