चांदणी : उद्योजकतेवर इतकी प्रभावी चर्चा, सगळ्याना एका विचारा वर, एका दिशेनी नेणारी चांदणी अशी असून उपयोगी नाही म्हणून हा प्रतिसाद 

१) मला न उरले देणंघेणं, आता या जगाशी

२) जन्म-मरण बिंदूतूनी, विटली देहदिंडी माझी
हा शेवटचा मुक्काम आता, तुझ्याच चरणी थांबो

३) तडफडे इथे माझा, निष्पाप प्राण देहांती

४) वंचना तिच ती, तोच प्रंपच अन तेच वर्मी घाव

कविता हवी पण मानसिकता अतिशय विधायक हवी. ज्या जगात जगायचं, ज्या जगण्यासाठी काही करायचं त्या जगाविषयी असं उदास होऊन कसं चालेल? मला कवितेच्या फॉर्म बद्दल काही म्हणायचं नाही. पण आपण आपल्या प्रत्येक अभिव्यक्ती बद्दल सावध हवे. निदान निराशेतून तरी काही निर्माण करू नये कारण त्यातून बाकीचे निराश होतात आणि बेसिकली निराशेतून निराशाच जन्म घेते. सगळ्याना या जीवना विषयी प्रेम वाटेल असं काहीतरी लिहावं, बोलावं, करावं. आपल्या भोवती एक सुंदर वातावरण तयार करावं अश्या मताचा मी आहे. तुझ्या अतिशय उपयोगी चर्चेत माझा मोठा सहभाग होता आणि माझे प्रतिसाद तुला उपयोगी झाल्याच तू लिहलयस म्हणून हे सर्व.                                                                                    संजय