बाकी इतर प्रांतांतून महाराष्ट्रात येणाऱ्या अथवा मराठीव्यतिरिक्त इतर मातृभाषा असणाऱ्या परंतु मराठी भाषा उत्कृष्टरीत्या आत्मसात करणाऱ्या अमराठीभाषकांची (वैयक्तिक ओळखीतली तसेच सार्वजनिक) उदाहरणेही पाहिलेली आहेत. (इतक्या उत्कृष्टरीत्या की अगोदर कल्पना नसल्यास आणि डोळे मिटून बोलणे ऐकल्यास ही व्यक्ती मुळात मराठीभाषक नसावी हे कळू नये. )

माझ्या आठवणीतही अशी अनेक उदाहरणे आहेत. त्याचबरोबर मराठी मुलुखात जन्मून, वाढून, मराठी माध्यमात शिकूनही प्रतिज्ञेने मराठी 'न' बोलणारी उदाहरणेही मी पाहिलेली आहेत!