प्रिय मिल्या,
मी ही कविता ३/४ वेळा वाचली पण 'तो' 'तिला' म्हणतोय हे तुझ्या ७/०५ च्या प्रतिसादा वरून कळलं!
पण तसे असेल तर प्रियकर प्रेयसीला शोधतो आणि ती त्याला कधी भेटेल हे सांगता येत नाही (२). प्रियकर कसा तिला तू शोधयचे सोडू नको म्हणेल?
शेवटी सुद्धा प्रियकर 'तिला तू नभाचा, तू न माझा' कसे म्हणेल?
माझ्या मते एका उत्कट अनुभवाची एकसंध काव्यात्मक अभिव्यक्ती म्हणजे कविता. कविता हे जगण्यावर भाष्य असेल तर सगळे शेर त्या मूडचे हवेत. प्रेयसी प्रियकराला काही सांगत असेल तर कवीतेचे पूर्ण ओरियंटेशन तसे हवे त्यामुळे अभिव्यक्तीत एकसंधता येते.
परत सुरूवात तो तिला म्हणतोय असं वाटत नाही, ते जीवनावरच भाष्य वाटतं.
तुझ्याकडे प्रतिभा आहे पण अनुभव उत्कट असेल तरच कवितेची मजा आहे असं तुला वाटत नाही का? संजय