'बंबैया हिंदी' या खास मुंबईच्या प्रकाराचे

'मुंबईची हिंदी' ही अतिशय सोपी भाषा आहे, असे मला माझ्या मर्यादित अनुभवानुसार वाटते. क्रियापदाची अगदी कमी रूपे, सामान्यरूपे नाहीत आणि मुख्य म्हणजे एक लिंग आणि एक वचन. उदा. एकजण लग्नसमारंभाची हकीगत सांगत असताना मी असे ऐकले आहे - ".... शादीका टाइम वो आया - उसका वाइफ आया - घरका सब लोग आया.... "

असे असल्याने कदाचित ती आत्मसात व्हायला सोपी जात असावी. मराठीतील तीन लिंगे, सामान्यरूपे आणि च, ळ असे विशिष्ट उच्चार असल्या काही गोष्टींमुळे अमराठी व्यक्तीला मराठी इतर भाषांहून जड वाटत असावी, असे वाटते.