वरील काही प्रतिसादात, मराठी लोकांना चांगलं हिंदी अथवा इंग्लिश येत नाही असा सूर/टीका झालेली दिसते. प्रत्यक्षात सुद्धा मराठी लोकांचा हिंदी किंवा इंग्लिश चा टोन हा किती टिपिकल मराठी असतो ह्यावर आपणचा आपल्या लोकांची खिल्ली उडवत असतो. माझ्यामते हे चूक आहे. एकमेकांना प्रोत्साहन देऊन आत्मविश्वास वाढवायचा की चुका काढत बसायचं? अशानेच तर न्यूनगंड येतो. (तसं बघायला गेलं तर गुजराथी हिंदी टोन हा जास्त मजेशीर असतो, तमिळ इंग्लिश टोन हा देखिल मराठी पेक्षा जास्त मजेशीर असतो. उगाच आपण आपल्या गोष्टींना/सवयिंना नावे ठेवणे बंद केले पाहिजे.)
टगेराव, आपल्याशी जर कोणी इंग्लिश बोलायचा प्रयत्न करू पाहत आहे, तर आपण आपले बोलणे दुसऱ्या भाषेवर का न्यावे? आपण आपल्या चांगल्या भाषेचे नमुने त्या व्यक्तीला ऐकवावे. शेवटी भाषा ही ऐकून ऐकूनच सुधारणार ना?