हिंदीभाषिक लोकांना किती भाषा येतात ? २च ना ? मग हा ३ भाषांचा बोजा आपल्यावरच का ? तशीही थोडीफार हिंदी प्रत्येकच मराठी माणूस बोलू शकतो, त्यासाठी वेगळी शिकावी हि जबरदस्ती मुळीच नको. सोबत इतर भाषाही पर्याय म्हणून असाव्या अन ह्या भाषा शिकण्याचा पर्याय सर्वांना (विज्ञान, कला, वाणिज्य, तंत्रज्ञान, इ. ) असावा. जितक्या भाषा शिकणार असेल त्या उत्कृष्ट असाव्या.
मराठी आणि बिजिनेस इंग्लिश मात्र प्रत्येकाला आवश्यक करावी. मराठी नुसती लिहून नव्हे तर श्रवण, आकलन, वाचन, लेखन व संभाषण ह्या सर्व कौशल्याचा त्यात अंतर्भाव असावा. TOEFL / TOEIC सारखी मराठीची सुद्धा खास परीक्षा असावी. (आणि सर्वच भाषांकरिता)
अवांतर :- मराठी, इंग्रजी आणि हिंदीव्यतिरिक्त, प्राथमिक पातळीवर मला गुजराथी आणि कोरिअन येतात.