आपणा सर्वांना हिंदी चांगले आलेच पाहिजे
हे विधान तितकच हिंदी भाषिकांना लागू पडतं. इतर कोणत्याही अहिंदी प्रांतापेक्षा मराठी लोकांची हिंदी चांगलिच असते. गुजराथी घ्या किंवा बंगाली.. किंवा दाक्षिणात्य .... त्यांच्यापेक्षा १०० पटींनी मराठी माणुस परवडला अस हिंदीकर म्हणतील. अन हा नियम हिंदी भाषिकांना लागू पडत नाही का? त्यांना धड ना हिंदी येतं ना इंग्रजी. तिसऱ्या भाषेचा प्रश्नच नाही. म. प्र. च्या काही भागातील हिंदी वगळता व्यवस्थित हिंदी कोणिही बोलत नाही. उ. प्र. हरियाणा, बिहार यांची हिंदी अतिशय घाणेरडी वाटते, सतत भांडल्यासारखी आणि धमकावल्यासारखी.
हिंदी हि एक भाषा म्हणून ठिक आहे, पण "मावशीची मुलं" डोक्यावर बसणार नाही याची काळजी घेतलिच पाहिजे.
एकंदरीत भाषा चांगल्या आल्या पाहिजेत. भाषांवर प्रेम असले की कुठलीही भाषा लगेच आत्मसात करता येते असे मला वाटते.
हे १०० % पटलं.